Friday, February 10, 2017

15 फेब्रुवारीला इस्रो 104 उपग्रह प्रक्षेपित करत विश्वविक्रम करणार

15 फेब्रुवारीला इस्रो / भारत एका दमात 104 उपग्रह पाठवत विश्वविक्रम करणार

15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो एका दमात ( प्रक्षेपणात ) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे.

पुढच्या आठवड्यात बुधवारी सकाळी 9.28 मिनिटांनी श्रीहरिकोटा हुन इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक PSLV च्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे.

या प्रक्षेपणात पृथ्वीची अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रे काढणारा 714 किलो वजनाचा Cartosat 2 नावाचा उपग्रह पाठवला जाणार आहे.

सुमारे 4.7 किलो वजनाचे अमेरिकेतील खाजगी कंपनीचे एकूण 96 उपग्रह ( नॅनो सॅटेलाईट्स ), तर इस्त्राईल ,कझाकिस्तान, युएई, नैदरलँड, स्वित्झर्लंड देशांचे एक ते 4 किलो वजनाचे प्रत्येकी एक उपग्रह सोडले जाणार आहेत. या सर्व परदेशातील nano satellites 1चे एकूण वजन हे 644 किलो असणार आहे.

तर भारताचे सुमारे 10 किलो वजनाचे INS 1A आणि INS 1B हे दोन उपग्रह सोडले जाणार आहे.

मोहीम यशस्वी झाली तर PSLV प्रक्षेपकाची सलग 36 वी यशस्वी व्यावसायिक मोहीम असणार आहे.

अशा एकूण 104 उपग्रहांचे वजन 1378 किलो असणार आहे.

रशियाने 2014 च्या जुलै महिन्यात एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विश्व विक्रम केला होता.

इस्रो / भारत आता विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

विशेष म्हणजे 104 उपग्रह सामावून घेणारा , पकडून ठेवणारा भलामोठा adopter इस्रोने तयार केला आहे. 505 किमी अंतरावर पोहचल्यावर ठराविक सेंकदांनी हे सर्व उपग्रह या adopter पासून वेगळे होतील. प्रत्येक उपग्रह वेगळा होतांना काही सेकंदांचा कालावधी ठेवला गेला असल्याने उपग्रहांची टक्कर होणार नाही हे विशेष. तेव्हा उपग्रहांचा जथ्था अवकाशात पोहचल्यावर 104 उपग्रहांना वेगळे करत नियोजित कक्षेत पोहचवण्याचे खरे आव्हान इस्रोपुढे असणार आहे.

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...