भटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.
Saturday, April 24, 2021
खोल समुद्रातील कचऱ्याचे प्रमाण हे किती मोठे आहे ?
समुद्रातील कचरा ही काही नवीन गोष्ट नाही. कोणत्याही समुद्राच्या किनाऱ्यावर आसपास लोकवस्ती असेल तर हमखास किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य आढळेल. या कचऱ्यात प्लास्टिक, रबर आणि अन्य विघटन न झालेल्या कोणत्याही गोष्टी आढळतील. समुद्र हा कचरा आपल्याला परत करतो हे खरंच आहे. भरतीच्या वेळी लाटा हा कचरा परत किनाऱ्यावर आणून सोडतात. असा हा किनाऱ्यावरील कचरा ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे ज्याकडे सर्वांनीच गांभीर्याने बघितले पाहिजे यात शंका नाही. अर्थात हा कचरा काढणे - वेचणे हे मोठ्या प्रमाणात शक्यही आहे.
अर्थात समुद्रातील सर्वच कचरा किनाऱ्यावर परत जात नाही तर तो खोल समुद्राकडे जातो. तर दुसरीकडे थेट भर समुद्रात कचरा हा विविध जलवाहतुकीच्या - मासेमारीच्या निमित्ताने टाकला जातो. असा हा भर समुद्रातील कचरा किनारा कधीच बघत नाही. समुद्रातील अंतर्गत प्रवाह, वाऱ्याची दिशा, नैसर्गिक घटना या सर्वांमुळे भर समुद्रातील कचरा हा तिथेच भर समुद्रातच फिरत रहातो. यामुळे जगात या कचऱ्याचे काही पट्टे भर - भाग हे खोल समुद्रात तयार झाले आहेत. महासागरात अशा कचऱ्यांचे साधारण 5 प्रमुख पट्टे / भाग ( Sea Garbage Patch ) समजले जातात.
ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच, साऊथ पॅसिफिक गार्बेज पॅच, भारतीय महासागर, नॉर्थ अटलांटिक, साऊथ अटलांटिक.
विविध अभ्यास ,निरीक्षणे यापासून असा एक अंदाज आहे की ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅचमध्ये 80 हजार टन कचरा आहे. अर्थात हा एक अंदाज आहे. यापेक्षा कितीतरी जास्त पट कचरा पसरला असावा असा अंदाज आहे. तर उर्वरित पट्ट्यात ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅचच्या एक चतुर्थांश पेक्षा कमी कचरा आहे. या सर्व पाचही कचऱ्याच्या पट्ट्याची लांबी काही हजार किलोमीटरपर्यंत आहे. अर्थात या सर्व खोल समुद्रात कचरा हा काही सलग आढळणार नाही. तर बहुतांश कचरा हा विखुरलेला आहे. तर फक्त काही ठिकाणी कचरा हा सलग मोठ्या स्वरूपात एकत्र पहायला मिळतो.
हा कचरा म्हणजे मासेमारी करतांना फेकून दिलेली जाळी, मासेमारी करतांना - जलवाहतूक करताना वापरलेले रबर - थर्माकोलचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, पत्र्याचे टिन, प्लास्टिकशी संबंधित अनेक गोष्टी अशा विविध स्वरूपात आहे. काही कचरा हा हाताने वेचता येईल या स्वरूपात आहे, तर मोठ्या प्रमाणात कचरा हा सूक्ष्म स्वरूपात - बारीक तुकड्यांच्या स्वरूपात आहे. मघाशी म्हंटल्याप्रमाणे किनाऱ्यावरील कचरा हा किमान गोळा तरी करता येईल पण भर खोल समुद्रातील हा कचरा गोळा करणे निव्वळ अशक्य आहे. प्लास्टिक, रबर यांचा विघटन काळ लक्षात घेता पुढील कित्येक वर्षे हा कचरा तसाच राहणार आहे, उलट मोठ्या प्रमाणात कचरा हा छोट्या तुकड्यामध्ये विभागला जाणार आहे. सर्वच कचरा हा काही समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतांना बघायला मिळणार नाही, तर कित्येक टन कचरा हा समुद्राच्या तळाशी किंवा माशाच्या पोटातही पोहचला असणार यात शंका नाही.
अर्थात हा कचरा माशांसाठी घातक आहे. खाऱ्या पाण्यातील माशांमध्ये प्लास्टीक, घातक मूलद्रव्ये यांचे अंश सापडत असल्याचं शास्त्रज्ञ - संशोधक सांगत आहेत. या कचऱ्यामुळे पाण्यातील जलसृष्टीवरही परिणाम होत आहे.
खोल समुद्रात पसरलेला हा महाकाय कचरा डोळ्यांनी सहज दिसण्याचा प्रश्नच नाही, त्याचे अस्तित्व लक्षात येणेही अशक्य आहे, त्यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात येणे अवघड आहे. अशा या खोल समुद्रात कचऱ्याची वेगाने भर पडत आहे. अर्थात हा कचरा अजिबात उचलला जात नसल्याने, त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच नसल्याने भर समुद्रातील हे Sea Garbage Patch हे भविष्यात मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.
याबद्दल काही माहिती वजा व्हिडियोची लिंक शेयर करत आहे. हे बघितल्यावर या विषयाचे गांभीर्य आणखी अधोरेखित होईल.
https://www.youtube.com/watch?v=6HBtl4sHTqU https://www.youtube.com/watch?v=vrPBYS5zzF8
https://www.youtube.com/watch?v=soi6HywFSC4
https://www.youtube.com/watch?v=mMG1SdeYLFE
Subscribe to:
Posts (Atom)
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...

-
" बेकार " म्हणजे काय ? या ठिकाणी बेकार शब्दाची व्याख्या काय ?... नोकरी नसलेला - नाही... , सुशिक्षित पण नोकरी नाही - तसंही...
-
चर्चेतील हालेवारा गांव सध्या गडचिरोलीतील हालेवारा गाव चर्चेत आहे ते तिथं नक्षलवाद्यांनी केलेल्या 12 लोकांच्या अपहराणांमुळे. आठवडाभरात...
-
" साल्हेर किल्ला " माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...