Saturday, May 4, 2019

नौदलासाठी नवे हेलिकॉप्टर

AEW म्हणजेच Airborn Early Warning And Control क्षमता असलेली रशियन बनावटीची Kamov - 31 हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय Defence Acquisition Council (DAC) ने घेतला आहे.   

10 हेलिकॉप्टर नौदल ताफ्यात प्रत्यक्ष करार झाल्यावर दाखल होणार आहेत. या व्यवहारासाठी सुमारे 3600 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

या हेलिकॉप्टरचे मुख्य वैशिष्टय म्हणजे यावरील असलेल्या वैशिष्टयपूर्ण रडारामुळे भर समुद्रात 150 किमी परिघातील लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन वगैरे शोधणे सहज शक्य होणार आहे. तसंच 200 किमी परिघातील पाण्यावरील जहाजे, युद्धनौका यांचा ठाव घेणे शक्य होणार आहे. हवेत उड्डाण करतांना एवढ्या अंतरावरील शत्रू पक्षाच्या हालचालीबद्दल रडारद्वारे मिळालेली माहिती ही 250 किमी अंतरावरील स्वतःच्या युद्धनौकेकडे पाठवण्याची क्षमता या Kamov -31 मध्ये आहे.

अशा हेलिकॉप्टरमुळे नौदलाच्या मारक क्षमतेत भविष्यात मोठी भर पडणार आहे हे निश्चित.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...