भटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.
Thursday, November 26, 2015
पत्रकारीतेमधील " भटकंती "......
Tuesday, October 6, 2015
जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक
जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक
दर वेळी शहरांतील बकालपणा, अस्वच्छता, पायाभूत सोयीसुविधा नसणे, वाहतूक समस्या, यासाठी पालिका क्षेत्रातील राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि ( नेहमीच स्वत: ची कातडी वाचवणारे ) प्रशासन यांनाच जबाबदार धरले जाते. मात्र कडोमपातील सध्याच्या अधोगतीला स्वत: ला सुशिक्षित, सुसंस्कृत , मध्यमवर्गीय ( आता काही प्रमाणात उच्च मध्यमवर्ग ) समजले जाणारे नागरीकच जबाबदार आहेत असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. कारण धाक ठेवू शकणारा नागरीकांचा दबाव गट नावाचा प्रकारच सध्या कडोमपामध्ये अस्तित्वात नाहीत. किमान वडीलधा-यांनी डोळे वटारावेत आणि धाकामुळे सत्ताधा-यांनी ऐकावे अशीही आता परिस्थिती नाहीये.
मुंबई-पुणे, नाशिक किंवा काही मोजक्या ठिकाणी त्या भागांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांना धारेवर धरणारे नागरिकांचे गट - संस्था अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी एखादा मुद्दा नागरिकच रेटून थेट अंमलात आणायला लावतात. प्रशासन, सत्ताधारी यांनी काही चुका केल्या तर त्यावर रान उठवत निर्णय बदलायला किंवा निर्णय मागे घ्यायला भाग पाडतात. या सर्वांचा पूर्णपणे अभाव कडोमपामध्ये दिसत आहे.. नव्हे तो आहे.
युवा गट, माहिती अधिकाराचा वापर करणार गट ( ब्लैकमेलिंग वाला नाही ), ThinkTank चा गट, बैंकिंग -उद्योग- शिक्षण यामधील विचारवंत - अभ्यासु लोकं, वरिष्ठ नागरिकांचा गट, महिलांचे विविध गट..... असे गट पाहिजेत जे सत्ताधारी, प्रशासन यांच्या संपर्कात राहून पालिकेच्या भागातील निर्णयांमध्ये आपला सहभाग नोंदवतील, चुका सांगतील, चांगल्या निर्णयांचे खुल्या मनाने स्वागतही करतील. असे लोक, अशा संस्था कडोंमपा जरूर आहेत, पण पालिकेला हलवतील, कामाची दखल घ्यायला भाग पाड़तील अशी त्यांची मजल अजिबात नाही. किंबहुना यापैकी काही लोकं, संस्था या एखाद्या विचारसरणीला चिकटुन आहेत. त्यामुळे सक्षम असा नागरीकांचा मोठा दबाव गट कडोंमपा परिसरात तयारच झाला नाही.
त्यामुळेच सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फावले आहे. विरोधकांनी आधी बेटकुळ्या दाखवल्या ख-या पण यांमधील हवा ही काही महिन्यांतच निघून गेली. कोणी जाब विचारणारा वडीलधारी नसल्याने, दबाव गट नसल्याने गेल्या पाच वर्षांनंतरही कडोंमपा ही आहे तिथेच राहिली आहे. आता काहीच मुठभर लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यामुळे चांगुलपणा टिकून राहिला आहे.
सध्या सेना-भाजप पुन्हा पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर - मुद्द्यांवर निवडणुका लढवत आहे. विरोधक म्हणून साफ अपयशी ठरलेले, कमजोर झालेल्या मनसे- कांग्रेस - राष्ट्रवादी या पक्षांना संधी मिळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.
निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण जोपर्यन्त डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यन्त पसरलेल्या या कडोंमपामध्ये जाब विचारणारी नागरिकांची सक्षम यंत्रणा तयार होत नाही तोपर्यन्त निवडणुकांमध्ये या सुशिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांना गृहीतच धरले जाणार. कारण राजकीय पक्षांना पक्के माहीत आहे की लोकं जाणार कुठे, कोणाला मत देणार.....आम्हांलाच मत देणार.
तेव्हा नागरिकांनी उठा, जागे व्हा, संघटित व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.
Wednesday, September 23, 2015
सेलिब्रेशन मंगळयानाच्या यशाच्या वर्षपुर्तीचे..
Friday, May 22, 2015
इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat
भारताची अवकाश संस्था म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वाटचालीची 60 वर्षे पुर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1975 ला भारताने आर्यभट्ट नावाचा 360 किलो वजनाचा उपग्रह सोव्हिएत रशियाच्या मदतीने सोडला होता. तेव्हा उपग्रह सोडण्याच्या काळालाही आता 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.
या दुर्बिण प्रकल्पामध्ये इस्त्रोबरोबर Tata Institute of Fundamental Research, Mumbai, Indian Institute of Astrophysics, Bangalore, Raman Research Institute, Bangalore, आयुका म्हणजेच Inter-University Centre for Astronomy and Astrophysics, Pune, Bhabha Atomic Research Centre, Mumbai, S.N. Bose National Centre for Basic Sciences, Kolkata, Canadian Space Agency, University of Leicester अशा विविध संस्था सहभागी होत आहेत. यामुळे या दुर्बिणीने पाठवलेल्या माहितीचा अभ्यास कऱण्याची संधी या संस्थांमधील संशोधकांना, विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या दुर्बिण प्रकल्पातून मिळालेला अनुभव भविष्यातील आणखी विविध मोहिमांसाठी उपयोगी पडणार आहे.
Astrosat मध्ये मात्र विविध तरंगलांबी टीपण्याची क्षमता असल्याने ज्या गोष्टी साध्या डोळ्यांनी दिसत नाहित, असे विविध प्रकारचे असंख्य तारे, आकाशगंगा, धूमकेतु, ढग, धुळ, कृष्णविवरे, ग्रह यांची माहिती आपण या दुर्बिणीद्वारे मिळवणार आहोत. आणि हे सर्व एकाच दुर्बिणीद्वारे करणार आहोत. कारण विविध तरंगलांबी पकड़ण्याची या दुर्बिणीची क्षमता असणार आहे.
हे अवकाश - विश्वच एवढे अनंत - अफाट आहे की कोण जाणे आपल्या इस्त्रोच्या दुर्बिणीतून काही नवीन शोध लागतील....
इस्त्रोच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा.
Saturday, April 25, 2015
हबल दुर्बिणीची पंचवीशी..
Thursday, April 9, 2015
निमित्त Scorpene पाणबुडीचे.....
Friday, April 3, 2015
कडोंमपा, आहे तिथेच...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.
त्यामुळे एप्रिलनंतर कडोंमपातील विविध भागांची पायधुळ विविध पक्षांचे नेते, राज्याचे मंत्री झाड़तांना दिसायला लागतील. याची झलक मात्र दिसायला सुरुवात झालेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कारणांनी का होईना तीन वेळा कडोंमपात येऊन गेले आहेत. राज्यात 27 महापालिकांपैकी काही प्रमुख पालिका वगळता मुख्यमंत्र्यांच्या कडोंमपाच्या फे-या सर्वात जास्त झाल्या आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून कडोंमपाचे प्रश्नही जोराने पुढे येऊ लागले आहेत.
पण मुळात असे प्रश्न उद्भवण्याची वेळ का येते ?. त्यात उद्भवलेले प्रश्न पुन्हा तेच ते आहेत. कारण गेल्या 5 वर्षात कडोंमपा केवढी बदलली आहे असा प्रश्न विचारला तर आहे ती आहे तिथेच आहे, समस्या काही सुटल्या नाहीत असं म्हंटल तर ते चुकीचे होणार नाही.
त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक आणि सत्ताधारींना धाकात ठेवण्याची क्षमता असणारे विरोधक नगरसेवक ( अशी किमान अपेक्षा विरोधकांकडून असते ) यांनी काय केले असा प्रश्न पडतो.
काही सन्माननीय नगरसेवक - लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वॉर्डमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा संपुर्ण कड़ोंमपाकड़े बघतांना काही प्रश्न जरूर पडतात ज्याची उत्तरे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी द्यावीत.
1..श्रीनगर ते कन्याकुमारी असा मोठा चारपदरी रस्ता बांधायचा झाल्यास जसा वेळ लागेल तसा कडोंमपातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला का वेळ लागला आणि लागत आहे ? एवढा वेळ लागूनही काँक्रीटीकरणाबद्दलच्या दर्जाबद्दल का तक्रारी आहेत ? इतर काही ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही वाईटच आहे.
2..आजही सर्वसामन्यांना आरोग्य सेवेसाठी खाजगी सेवेवर किंवा मुंबई - ठाणेवर अवलंबून रहावे लागते. कड़ोंमपाची आरोग्य सेवा का सक्षम झाली नाही ?
3..आजही कडोंमपामध्ये रस्त्यावरील गर्दी टाळता यावी यासाठी चालण्याजोगे फुटपाथ का नाहीत ?
4.. कडोंमपातील वाहतुक कोंडीवर उपाय शोधण्यात लोकप्रतिनिधींना का अपयश आले ?
5..ठाकुर्लिजवळ पूर्व - पश्चिम भागाला जोड़णा-या उड्डाणपुलाचे काय झाले ?
6..रिक्शा चालकांच्या दादागिरीशी नगरसेवकांचे ( आणि प्रशासनाचेही ) काहीच देणंघेणं नाही का ? रिक्षाचालकांकडून होणारा त्रास कधी कमी होणार ?
7..भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जादाचे 140 mld पाणी कधी कडोंमपाला मिळणार ?
8..घरी पाहुणे आल्यावर किंवा संध्याकाळी फॅमिलीला फिरवण्यासाठी - निवांत वेळ घालवण्यासाठी कडोंमपात मनोरंजनाचे ठिकाण मग ते मोठी बाग - उद्यान, vidyaan केंद्र, एखादे माहिती केंद्र, ( एखाद्या शहराच्या तोडीस तोड़ असा ) सुशोभित घाट, ( राजकीय पक्षांना निवडणुकीत घोषणा करण्यासाठी आवडणारे) एखादे मोठे स्मारक का विकसित झाले नाही ?
9..कड़ोंमपाला लागून सर्वात प्रदूर्षण करणारी डोंबिवली MIDC यामधल्या प्रदूर्षणावर का अजूनही नियंत्रण ठेवता आलेले नाही ?
10..डंपिंग ग्राउंडचा प्रश्न आजही का सुटलेला नाही ?
11.. अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकणा-या वेशीवरच्या गावांत सोयीसुविधा पाच वर्षांनंतरही का झाल्या नाहीत ?
12.. आधीच कड़ोंमपात सोयीसुविधांचा अभाव असतांना 27 गावांना सामावून घेत त्यांचे असे कोणते भले पालिका करणार आहे ?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राजकीय पक्षांनी द्यावीत. दर तीन महिन्यांनी येतो असे म्हणणारे राजकीय नेते खरेच किती वेळा आले हा संशोधनाचा विषय आहे.
राज्यातील सर्व अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेणा-या फडणवीस साहेबांनी आपण इतर पक्षांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्टपणे दाखवत या पालिकेतील अवैध बांधकामांचा प्रश्न एका फटक्यात निकाली काढला आहे.
डोंबिवलीत नववर्षानिमित्त नववर्षाचे स्वागत करणारी शोभायात्रा पहिल्या वर्षापासून प्रसिद्ध आहे. असं असलं तरी गेल्या 5 वर्षात कड़ोंमपाची किती शोभा वाढवली असा प्रश्न सर्वसामान्यांनी आत्तापासूनच लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना जरूर विचारला पाहिजे. कारण तेच पक्ष, तेच चेहरे घेत, पुन्हा तेच प्रश्न मांडत, त्याच प्रश्ननांवर, तीच आश्वासन देत मतांसाठी पुन्हा एकदा तुमच्या पुढे उभे रहाणार आहेत.
#KDMC
#kalyan
#dombivali
Thursday, April 2, 2015
मेट्रो - 3चा जांगडगुंता....
Friday, February 13, 2015
सर्वात मोठा हवाई शस्त्रास्त्रांचा बाजार...Aero India..
१८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान भारतात बेंगलोर इथे जगातील सर्वात मोठा असा संरक्षण क्षेत्रातील हवाई विभागाचा शस्त्रास्त्रांचा बाजार भरणार आहे. खरं तर हवाई दलांच्या कसरती म्हणजेच Air Show असे त्याचे गोंडस नाव आहे. दर दोन वर्षांनी भऱणा-या या शस्त्रास्त्राच्या कुंभ मेळ्याचे हे दहावे वर्ष. असे Air Show जगभरात गेली अनेक वर्षे भरत आहेत. कारण या निमित्ताने विविध देशातील संरक्षण क्षेत्रातील बलाढ्य कंपन्या आपापली उत्पादने या बाजारात ओतत असतांत आणि मोठ-मोठे करार होत असतात. गंमत म्हणजे भारताने हा Air Show सुरू केल्यापासून जगभरातील कंपन्या अक्षरशः धावत या Air Show मध्ये ताकदीने सहभागी होत आहेत. कारण संरक्षण क्षेत्रात खास करुन हवाई दला क्षेत्राच्या बाबतीत भारत मोठी बाजारपेठ ठरला आहे.
भारताचा संरक्षण क्षेत्राचा अर्थसंकत्प हा 37 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2 लाख 29 हजार कोटी रुपये एवढा आहे. यापैकी 40 टक्के रक्कम ही शस्त्रास्त्रे खरेदीवर खर्च होते. यापेैकी एक चतुर्थांश वाटा हा वायू दलाला मिळतो. विशेष म्हणजे 60 टक्के शस्त्रास्त्रे भारत आयात करतो. त्यातच बदलती आतंरराष्ट्रीय समीकऱणे, शेजारील राष्ट्रांमध्ये असलेली अस्वस्थता लक्षात घेता गेली काही वर्ष भारत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र संथ निर्णय़ घेण्याची प्रक्रिया, लाल फितीचा कारभार, नोकरशाही, भलत्याच गोष्टांना महत्व देणारी सरकारे यामुळे संरक्षण क्षेत्र कमालीचे पिछाडीवर पडले आहे. त्यातच भारतीय वायू दलाची पिछेहाट डोळ्यात भरणारी आहे.
वायू दलाकडे सध्या लढाऊ विमानांची कमतरता आहे. विविध प्रकारच्या क्षमतेच्या मालवाहू विमानांची आवश्यकता आहे. विविध प्रकारची हेलिकॉप्टर म्हणजे टेहेळणी करणारी हेलिकॉप्टर, जड वजन वाहून नेणारी विविध प्रकारची हेलिकॉप्टर, विविध वैमानिकरहित विमाने, जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे , विविध क्षमतेची रडार यांची कमतरता आहे.
तेव्हा भारताची गरज लक्षात घेता खऱं तर भारत म्हणून एवढा मोठा ग्राहक लक्षात घेता जगभरातील कंपन्यांचे प्रतिनिधी फक्त Air Show निमित्त नाही तर गेले काही दिवस भारतात ठाण मांडून बसल्या आहेत. हवाई दलाच्या वैमानिकांसाठी हेल्मेट, रात्री दिसू शकणारे कॅमेरे इथपासून लढाऊ विमानांपर्यंत या बँगलोरमधील बाजारात मांडले जाणार आहे. भारतातील कंपन्यांसह जगभरतील तब्बल 750 कंपन्या या पाच दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या निमित्ताने विविध शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती ठेवल्या जाणार आहेत. काही शस्त्रास्त्रे मग रडारपासून ते लढाऊ विमानांपर्यंत इथे प्रत्यक्ष बघायला मिळणार आहेत. काही कंपन्यांची लढाऊ, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर हवाई कसरतींमध्ये भाग बेंगलोरच्या हवाई दलाच्या तळाचे आकाश दणाणून सोडणार आहेत. तर मोजक्या देशांकडे असलेली, हवेत करामती - कसरती करू शकणारी विमाने उपस्थितांना खिळवून ठेवणार आहेत.
या Air Show चा फक्त भारताला फायदा होणार असं नाही तर श्रीलंका, नेपाळ, सारख्या असंख्य छोट्या देशांना होणार आहे. कारण खेरदीसाठीच्या सर्व काही वस्तू - शस्त्रास्त्रे जगात बाजाररहाट न करता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे.
सुरुवातीपासून या Air Show मध्ये वस्तू बघायची आणि ती वाटाघाटी करत विकत घ्यायची अशी प्रथाच पडली होती. मात्र संरक्षण क्षेत्रात नव्या सरकारने मेक इन इंडियाचा नारा लावला आहे. त्यामुळे यंदाचा अब्जावधी उलाढालींचा हा सोहळा काहीसा वेगळा ठरण्यासाठी शक्यता आहे. प्रत्यक्षिके होतील, चर्चा होतील, त्यानंतर बैठका होतील, वाटाघाटी होतील मात्र विकत घेणारी शस्त्रास्त्रे ही यापुढे भारतातच बनवली जातील असा निर्धार भारताने केला आहे. त्यामुळे यावेळचा Aero India अनेक पद्धतीने वेगळा असणार आहे.
परदेशी कंपन्यांची मदत घेत सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे भारतातच बनवण्याचा प्रयत्न यापुढे यशस्वी झाला तर कदाचित पुढील काही वर्षानंतर अशा कार्यक्रमाची गरजच भासणार नाही. त्यासाठी भारतात सरकारी कंपन्यांबरोबर खाजगी कंपन्याही विविध शस्त्रास्त्रांचे उत्पादन कऱण्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. तेव्हा पुढील काही वर्षांनी भारतीय कंपन्या परदेशातील अशा AIR SHOW मध्ये सहभागी व्हायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको, ते सर्व स्वप्नवतच असेल. भारत हवाई दलाच्या गरजेच्या बाबातीत स्वयंपूर्ण झाला असेल.
#MakeInIndia
#IAF
#AeroIndia
#FighterAirCraft
#UAV
#Helicopter
Sunday, January 18, 2015
तेजस..वायूदलाचे एक पाऊल पुढे
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...

-
" बेकार " म्हणजे काय ? या ठिकाणी बेकार शब्दाची व्याख्या काय ?... नोकरी नसलेला - नाही... , सुशिक्षित पण नोकरी नाही - तसंही...
-
चर्चेतील हालेवारा गांव सध्या गडचिरोलीतील हालेवारा गाव चर्चेत आहे ते तिथं नक्षलवाद्यांनी केलेल्या 12 लोकांच्या अपहराणांमुळे. आठवडाभरात...
-
" साल्हेर किल्ला " माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...