भटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.
Wednesday, July 10, 2019
नौदल आणि हवामानाचा अंदाज
Monday, June 3, 2019
नवा भिडू, नवं राज्य....मात्र आव्हान तेच
मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षात संरक्षण दलाचे बजेट हे आकड्याने जरी वाढले असले तरी अर्थसंकल्पात याची टक्केवारी ही २ टक्क्याच्या खाली घसरली. भारतासारख्या देशाने भौगोलिक, राजकीय, सामरिक परिस्थिती लक्षात घता संरक्षण दलाच्या बजेटचा आवाका हा चार टक्क्याच्या वर ठेवणे अपेक्षित असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.
आजही लष्कर, नौदल, वायु दल, तटरक्षकमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. सर्जीकल स्ट्राईक नंतर लष्कराकडे जाण्याचा ओढा वाढला आहे असं कुठेही ऐकीवात नाही. तेव्हा करियर म्हणून संरक्षण दल हे पहिल्या पाच क्रमांकात जेव्हा येईल तेव्हाच रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. याकरता सरकार काय करतं त बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या व्यतिरिक्त उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, सर्जिकल स्ट्राईक यासारख्या आणखी कोणत्या वेगळयाच घटना घडतील, संरक्षणाच्या दृष्टीकोनातून कोणते वेगळे राजकीय डावपेच येत्या काळांत आखले जातील याचा अंदाज लावणे कठीण आहे.
तेव्हा बघुया विद्यमान नवे संरक्षण मंत्री किती प्रभाव पाडतात ते, बघुया 'अनुभवी' मोदी सरकार काय काय करतं ते.
Saturday, May 4, 2019
नौदलासाठी नवे हेलिकॉप्टर
AEW म्हणजेच Airborn Early Warning And Control क्षमता असलेली रशियन बनावटीची Kamov - 31 हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय Defence Acquisition Council (DAC) ने घेतला आहे.
10 हेलिकॉप्टर नौदल ताफ्यात प्रत्यक्ष करार झाल्यावर दाखल होणार आहेत. या व्यवहारासाठी सुमारे 3600 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
या हेलिकॉप्टरचे मुख्य वैशिष्टय म्हणजे यावरील असलेल्या वैशिष्टयपूर्ण रडारामुळे भर समुद्रात 150 किमी परिघातील लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन वगैरे शोधणे सहज शक्य होणार आहे. तसंच 200 किमी परिघातील पाण्यावरील जहाजे, युद्धनौका यांचा ठाव घेणे शक्य होणार आहे. हवेत उड्डाण करतांना एवढ्या अंतरावरील शत्रू पक्षाच्या हालचालीबद्दल रडारद्वारे मिळालेली माहिती ही 250 किमी अंतरावरील स्वतःच्या युद्धनौकेकडे पाठवण्याची क्षमता या Kamov -31 मध्ये आहे.
अशा हेलिकॉप्टरमुळे नौदलाच्या मारक क्षमतेत भविष्यात मोठी भर पडणार आहे हे निश्चित.
Thursday, April 25, 2019
आता चांद्रयान - २ मोहिम जुलैमध्ये होणार.....
Thursday, February 28, 2019
मिग-२१ का सरस ठरले ?
Monday, November 5, 2018
भारताकडे आता ' त्रिशूळ '
सध्या अरिहंत पाणबुडी K -15 ( कलाम यांच्या नावाचे अद्याक्षर K ) हे क्षेपणास्त्र पाण्याखालून डागू शकते, ज्याची ७५० ते १००० किमी अंतरा पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. तर K - 4 हे आणखी क्षेपणास्त्र अरिहंतवर स्वार होण्याच्या प्रतिक्षेत आहे, ज्याची मारक क्षमता तब्बल ३,५०० किमी एवढी मोठी आहे.
Saturday, October 13, 2018
भारतीय नौदलात एक महत्त्वाची घडामोड....DSRV
Wednesday, September 19, 2018
वर्तमान एक वर्तुळ पूर्ण करत आहे......
Tuesday, May 15, 2018
' इस्त्रो ' चे बिझी वेळापत्रक.....
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...
-
#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...
-
#BrahMos #cruisemissile #indianarmedforces #Philippines #indonesia जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म...
-
नुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...













