चीनचे सामर्थ्य - आंतरखंडीय क्षेपणास्त्र बाळगणारी अणु पाणबूडी
ओबामा दौ-यानंतर अनेक विषयांना फाटे फुटले असून चीनला शह देण्यासाठी अमेरिका भारताचा कसा वापर करत आहे याचीही चर्चा जोरात सुरु आहे. येत्या काही वर्षात महासत्ता बनू पहाणा-या चीनला रोखण्यासाठी भारताला अमेरिका कशी मदत करत आहे, चीनला टक्कर देण्यासाठी भारताची ताकद कशी वाढवत आहे, याचे दूरगामी परिणाम कसे होतील, भारताला याचा भविष्यात फायदा होणार की तोटा याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. आर्थिक क्षमता, मनुष्यबळ, आयात-निर्यात, गुंतवणूक याबाबतीत चीन भारताच्या कितीततरी पुढे आहे. निदान दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्यांची तुलना केली तर भारताला अजून बरचा पल्ला गाढायचा आहे हे स्पष्ट होतं.
चीन-भारत देशांची लष्करी तुलना
लष्कर
भारत चीन
सशस्त्र सैन्यदल 13,25,000 22,85,000
राखीव सैन्य 9,60,000 8,00,000
निमलष्करी दल 12,90,000 6,60,000
रणगाडे 5,000 7,500
तोफखाना 3,200 20,000
आंतरखंडीय क्षेपणास्त्रे नाही आहेत
(पल्ला 10,000 किमीपेक्षा जास्त)
एवढंच नाही तर 5,000 किमीचा पल्ला असलेलं अग्नी-5 क्षेपणास्त्र आपण आत्ता कुठे विकसित करत आहे. मात्र चीनकडे 5,000 पासून ते 15,000 असा विविध पल्ला असलेली क्षेपणास्त्र आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोप-यातून वेळ पडल्यास चीन भारतावर हल्ला करु शकतो, अण्वस्त्र हल्ला करु शकतो. भारताला मात्र चीनवर हल्ला करण्यासाठी रेंजमध्ये रहाण्यासाठी स्वतःच्याच भूमीचा वापर करावा लागेल.
1980च्या दशकात बोफोर्स प्रकरण चांगलेच गाजले. मात्र यामुळे जगातील उत्तम दर्जाच्या फक्त 400 तोफा आपण विकत घेतल्या, खरं तर त्या आणखी जास्त आवश्यक होत्या, तसंच भारतात परवान्यावर बोफोर्सचं उत्पन्न करण्याचा आपला मानस होता. मात्र दलाली प्रकरणामुळे हे प्रकरण तिथेच थांबलं एवढंच नाही त्याचे स्पेअर पार्ट, डागडूजी सर्व काही आपल्याला स्वबळावर करावं लागलं. थेट कारगील युद्धातील बोफोर्सच्या जोरदार कामगिरीमुळे बोफोर्सची आपल्याला पुन्हा आठवण झाली. आता पुन्हा बोफोर्स नको म्हणून आपण दुस-या देशाच्या लांब पल्ल्याच्या तोफा विकत घेण्याच्या मागे आहोत. लांब पल्ल्याच्या तोफखान्याची चांगली वानवा आपल्याकडे आहे. मात्र चीनकडे उत्कृष्ठ दर्जाच्या तोफा आहे आणि स्वतः विकसित केल्या आहेत.
स्वदेशी Main Battele Tank म्हणजे अर्जून रणगाडा आत्ता कुठे 35 वर्षानंतर विकसित केला, त्याचं उत्पादन सुरु केलं आहे. भविष्यात आणखी उत्तम दर्जाचा रणगाडा विकसित करण्याचा प्रयत्न सुरु असून हे रणगाडे T-72 रणगाड्यांना रिप्लेस करणार. चीन याबाबतीत भाराताच्या कितीतरी पुढे आहे.
नौदल
भारत चीन
विमानवाहू युद्धनौका 1 --
विनाशिका 8 26
फ्रिगेट 12 49
कॉर्वेट 24 200 +
( वेगवान क्षेपणास्त्र हल्ला करु शकणा-या नौका )
डिझेल पाणबूड्या 15 56
अणु पाणबुडी - 8 +
Large Landing Ship 5 27
दोन्ही देशांच्या नौदलाच्या युद्धनौकांची तुलना केली तर आपण चीनच्या जवळपाससुद्धा नाही.
भारतात आयएनएस अरिहंत( 6,000 टन ) या अणु पाणबुडीच्या सध्या चाचण्या सुरु असून त्यानंतर अरिहंत वर्गातील आणखी दोन तर अरिहंतपेक्षा मोठी पाणबुडी बांधण्याचा विचार सुरु आहे. मात्र अणु पाणबुडी बांधणं, अडणींवर मात करत ती वापरणे ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे 2020 पर्यंत भारताकडे 6 अणुपाणबुड्या असतील असा अंदाज आहे.
तर चीनकडे हल्ला करणा-या वेगवान अणु पाणबुड्या 5 आहेत. तर आंतखंडीय क्षेपणास्त्र सोडणा-या दोन पाणबुड्या असून आणखी चार चीन बांधत आहे.
विमानवाहू युद्धनौकांच्याबाबातीत आपण चीनच्या पुढे आहोत. भारताकडे एक विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट असून ती 2012 ला सेवेतून रजा घेणार आहे. तर एक रशियाकडून तर एक स्वबळावर बांधली जात असून 2017 पर्यंत तीन विमानवाहू युद्धनौका भारताकडे असतील. तर चीन 2015 च्या सुमारास दोन विमानवाहू युद्धनौका दाखल करणार आहे.
वायू दल
भारत चीन
लढाऊ विमाने 387 1300
बॉम्बफेकी विमाने 239 600
AWACS 2 4
मालवाहू विमाने 229 300 +
हवेतल्या हवेत 6 10
इंधन भरणारी विमाने
एवढंच नाही तर 5th Generation म्हणजे अमेरिकेचं F-22 सारखं जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान चीन बनवत असून २०१५ पर्यंत ते सेवेत दाखल होईल. आपण मात्र रशियाबरोबर संयुक्तरित्या हे बनवणार असून ते दाखल व्हायला 2018 साल उजाडणार आहे. चीनने स्वदेशी बानवाटीचं पहिलं लढाऊ विमान १९७८ ला विकसित केलं, मात्र भारताचं स्वदेशी " तेजस " विमान 2011 मध्ये सेवेत दाखल होणार आहे. यावरुन वायू दलबाबतीतही भारत चीनच्या खूप मागे आहे ह स्पष्ट होतं.
उपग्रहभेदी क्षेपणास्त्र प्रणाली
चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची म्हणजेच Anti Satellite Missile ची चाचणी 11 जानेवारी 2007 ला घेतली आणि भारताला धक्का दिला. पण खरे हादरले ते अमेरिका-रशिया. टीव्ही, मोबाईल, इंटरनेटसाठीचे दळणवळण उपग्रह ,वातावरणाचे अभ्यास करणारे उपग्रह, टेहळणी उपग्रह यामुळं आता कृत्रिम उपग्रहांचे जगावर राज्य सुरु झाले आहे. जर एखादा उपग्रह त्यातच जर लष्करी किंवा टेहळणी उपग्रह नष्ट केला तर युद्धाचं पारड सहज फिरवता येऊ शकतं याची जाणीव बड्या देशांना आहे. . रशिया-अमेरिकेने असे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र 1970च्या दशकांत विकसित केले. चीनच्या चाचणीने आता काहीच सुरक्षित नाही याची जाणीव बड्या देशांना झाली. चीनकडे हे अस्त्र.....नव्हे तर ब्रमास्त्र तयार आहे. भारत अजून हे तंत्रज्ञान विकसित करत आहे.
क्षेपणास्त्र भेदी तंत्रज्ञान
शत्रू देशांने लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं, जर ते आपल्या शहरावर येऊन आदळणार असेल तर ते शत्रू क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडवणारं क्षेपणास्त्र, प्रणाली आपण विकसित केली आहे. यामध्ये 30 किलोमीटरपेक्षा कमी उंचीवर आणि 30 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर कुठलंही क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे असून 2012 नंतर हे क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान आपण सेवेत दाखल करुन घेणार आहोत. अमेरिका, रशिया, इस्त्राईलकडे असं तंत्रज्ञान आहे. चीन मात्र आपले पत्ते कधीच घड करत नाहीत. चीनकडे उपग्रह भेदी क्षेपणास्त्र असल्याने क्षेपणास्त्र भेदी तंत्रज्ञान असेल असा अंदजा व्यक्त करण्यात येत आहे.
Indian Armed Force At 2020
आर्थिक महासत्ता बनू पहाणारा भारत लष्करी ताकद वाढवण्याकडे दमदार पावलं टाकत आहे. चीन एवढं लष्करी सामर्थ्य आपण कधीच मिळवू शकणार नाही. मात्र भारत भूमीचे , भारताची सागरी सीमा ( तीनही बाजूला पसरलेला समुद्र, पर्शियन आखातामधील होर्मुझचे आखात ते मलाक्काचे आखात - जगातील 60 टक्क्यापेक्षा जास्त तेलाची वाहतूक आणि मालवाहतूक या मार्गावरुन होते ) सुरक्षित करण्याची ताकद आपण 2020 पर्यंत मिळवणार आहोत. 2020 पर्यंत भारताकडे काय येणार त्याची यादी पाहूया....
अत्याधुनिक बनावटीचे स्वदेशी रणगाडे
क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली
उपग्रहभेदी क्षेपणास्त्र, तंत्रज्ञान
हल्ला करणारे मानवविरहित यान
उत्कृष्ट लांब पल्ल्याच्या तोफा
लांब पल्ल्याचे रॉकेट लॉन्चर्स
जवानासाठी उत्कृष्ट दर्जाचा गणवेश ( नाईट व्हीजन गॉगल-कॅमेरा असलेले हेल्मेट,
संवाद साधण्यासाठी यंत्रणा, बुलेट प्रुफ जॅकेट, पाल्मटॉप- PalmTop वगैरे.... )
600 पेक्षा जास्त अत्याधुनिक लढाऊ विमाने
संयुक्तरित्या बनवलेले मालवाहू विमान
जड मालवाहू विमाने
सशस्त्र - हल्ला करणारे हेलिकॉप्टर
पाचव्या श्रेणीतील विमान
3 विमानवाहू युद्धनौका
10 पेक्षा जास्त विनशिका
18 पेक्षा जास्त फ्रिगेट
अत्याधुनिक 12 पाणबूडी
6 अणू ऊर्जेवर चालणार-या पाणबूड्या
लेझरयुक्त शस्त्र प्रणाली
आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ( 8,000 किमी पेक्षा जास्त पल्ला.... )
टेहळणी उपग्रह
तीनही दलांशी सूसंवाद साधणारी उपग्रहांची साखळी
15 पेक्षा लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने
12 पेक्षा जास्त रडार असलेली विमाने ( AWACS - Airborn Early Warning and Control System )
अब्जावधींचे लष्करी करार
2020 पर्यंत सुसज्ज होण्यसाठी भारताने 2004 पासून विविध देशांशी लष्करी करार करण्याचा धडाका लावला आहे. सध्या भारताच्या संरक्षण दलाचा अर्थसंकल्प आहे 32 अब्ज डॉलर्स( 30 Billion Dollers ). मात्र येत्या 10 वर्षात म्हणजे 2020 पर्यंत 50 अब्ज डॉलर्स फक्त शस्त्रास्त्रांची खरेदी, गुंतवणूकीसाठी आपण वापरणार आहोत. म्हणूनच भारताला शस्त्रास्त्र विकण्यासाठी अमेरिकेतील बलाढ्य शस्त्रास्त्र निर्मिती करणा-या कंपन्या गुडघ्याला बाशिंग बांधून भारतात खेपा घालत आहेत. ( ओबामा दौ-यातही कंपन्यांचे प्रतिनिधी होते) . पुढील महिन्यात रशिया, फ्रान्स देशांचे राष्ट्रपती भारतात येत आहेत, त्यांचे महत्त्वाचं काम असणार आहे ते लष्करी करारांवर सह्या करण्याचं.
यामुळं भारत चीनच्या हद्दीत लढण्यापेक्षा स्वतःच्या सीमा बळकट करण्याकडे लक्ष देत आहे. दोन्ही देशांची 2020 ला संख्यात्मक तूलना केली तेव्हाही भारत चीनच्या मागेच असणार आहे. ( तोपर्यंत चीन अमेरिकेला टक्कर देण्यायोगा सज्ज झालेला असेल ). मात्र सध्या भारत लष्कराची जी बांधणी करत आहे ते पहाता भारत स्वतःची सीमा बळकट करेलच पण जगात आर्थिक महाशक्तीबरोबर सामर्थ्यान लष्करी देश म्हणूनही ओळखला जाईल. म्हणूनच माजी नौदलप्रमुख अँडमिरल सुरीश मेहता एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते की यापूढील काळात नौदलाची ताकद ही Quantity पेक्षा Qualities वर अवलंबून असेल, उत्कृष्ठ तंत्रज्ञान देशाची ताकद ठरणार आहे.