भारताची अवकाश संस्था म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वाटचालीची 60 वर्षे पुर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1975 ला भारताने आर्यभट्ट नावाचा 360 किलो वजनाचा उपग्रह सोव्हिएत रशियाच्या मदतीने सोडला होता. तेव्हा उपग्रह सोडण्याच्या काळालाही आता 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.
गेल्या काही वर्षात देशाच्या संदेशवहन, दळवणळ, हवामान, संरक्षण या सर्वांसाठी आवश्यक गोष्टी आणि गरजा विविध उपग्रह अवकाशात पाठवत इस्त्रोने पुर्ण केल्या आहेत किंवा आता त्या पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणुनच इस्त्रो आता या गरजांच्या पलिकडच्या मोहिमांना हात घालत आहेत. याचे उदाहरण म्हणजे चांद्रयान -1 मोहिम आणि आत्ताची, जगाने कौतुक केलेली मंगळयान मोहिम. जगातील अवकाश तंत्रज्ञानाच्या घडामोडींमध्ये मागे राहू नये, तसा अनुभव मिळावा, भविष्यातील अवकाशातील तंत्रज्ञानाचे टप्पे इतर देशांच्या बरोबरीने गाठण्यासाठी इस्त्रोने या मोहिमा केल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.
Astrosat मोहिम
या घडोमोडींचाच एक भाग म्हणून इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy Satellite म्हणजेच Astrosat असे त्याचे नाव आहे. एकुण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असणार असून अवकाशाची विविध प्रकारची छायाचित्रे टिपणार आहे. साधारण 5 वर्षे या दुर्बिणीचा कार्यकाल असणार असून पृथ्वीपासून 650 किमी उंचीवरुन फिरतांना एका दिवसांत 14 प्रदक्षिण पुर्ण करणार आहे. या काळात दररोज तब्बल 420 गिगाबाईट्स एवढी छायाचित्रे वजा माहिती ही दुर्बिण बंगलोर इथल्या नियंत्रण कक्षाकडे पाठवेल.
यामुळे एक वेगळे माहितीचे दालन खुले होणार आहे.
या दुर्बिण प्रकल्पामध्ये इस्त्रोबरोबर Tata Institute of Fundamental Research, Mumbai, Indian Institute of Astrophysics, Bangalore, Raman Research Institute, Bangalore, आयुका म्हणजेच Inter-University Centre for Astronomy and Astrophysics, Pune, Bhabha Atomic Research Centre, Mumbai, S.N. Bose National Centre for Basic Sciences, Kolkata, Canadian Space Agency, University of Leicester अशा विविध संस्था सहभागी होत आहेत. यामुळे या दुर्बिणीने पाठवलेल्या माहितीचा अभ्यास कऱण्याची संधी या संस्थांमधील संशोधकांना, विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या दुर्बिण प्रकल्पातून मिळालेला अनुभव भविष्यातील आणखी विविध मोहिमांसाठी उपयोगी पडणार आहे.

अशी दुर्बिण पाठवत आपण काही वेगळे करत आहोत असे नाही. कारण अमेरिका, रशिया, युरोपियन स्पेस एजन्सीने अशा अनेक, विविध प्रकारच्या दुर्बिणी पाठवत अवकाशाचा अभ्यास केला आहे. मात्र त्यासाठी वेगवेगळ्या, विविध क्षमतेच्या दुर्बिणी पाठवल्या गेल्या होत्या. आपण हे सर्व एकाच दुर्बिंणमध्ये आजमावत आहोत अशी विविध तरंगलांबी पकड़णारी उपकरणे Astrosat मध्ये आहेत.
Astrosat मध्ये मात्र विविध तरंगलांबी टीपण्याची क्षमता असल्याने ज्या गोष्टी साध्या डोळ्यांनी दिसत नाहित, असे विविध प्रकारचे असंख्य तारे, आकाशगंगा, धूमकेतु, ढग, धुळ, कृष्णविवरे, ग्रह यांची माहिती आपण या दुर्बिणीद्वारे मिळवणार आहोत. आणि हे सर्व एकाच दुर्बिणीद्वारे करणार आहोत. कारण विविध तरंगलांबी पकड़ण्याची या दुर्बिणीची क्षमता असणार आहे.
हे अवकाश - विश्वच एवढे अनंत - अफाट आहे की कोण जाणे आपल्या इस्त्रोच्या दुर्बिणीतून काही नवीन शोध लागतील....
इस्त्रोच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा.

अमितजी खुप छान आहे धन्यवाद
ReplyDeleteअमितजी खुप छान आहे धन्यवाद
ReplyDelete